ग्रामपंचायत कलमठ यांच्या वतीने समृद्ध पंचायतराज महोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जात आहे. गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक प्रबोधन या उद्देशाने २५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्वच्छता अभियानाने झाली. असून पोलीस स्टेशन ते माणिक चौक, कलमठ या मार्गावर स्वच्छता करण्यात आली. याच कालावधीत २५ ते २९ डिसेंबर दरम्यान स्वच्छ वाडी/स्वच्छ संकुल स्पर्धा राबविण्यात येणार आहे.
२६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस स्टेशन समोरून प्रबोधनपर पथनाट्य आयोजन तर २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कलमठ गावातील स्मशानभूमी स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गावातील सार्वजनिक विहिरीचे शुद्धीकरण करण्यात आले होते, याच दिवशी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमठ येथे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे (शालेय गट) हा उपक्रम आयोजित करण्यात आले .

महोत्सवाचा समारोप ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रबोधनपर फुगडी कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळ्याने ग्रामपंचायत सभागृह, कलमठ येथे होणार आहे.

या उपक्रमांचे आयोजन सरपंच श्री. संदीप चंद्रकांत मेस्त्री, उपसरपंच श्री. दिनेश गोटणकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रविण कुडतरकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, नाडकर्णी नगर ग्रामस्थ सुरेश सावंत, चंद्रशेखर धानजी, मकरंद वायंगणकर, दीपराज माळवदे, पंढरीनाथ दळवी, प्रदीप धवन, सुदेश देसाई, साक्षी माळवदे, उत्तम सूर्यवंशी, उज्ज्वला धानजी तसेच चौहान व सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामपंचायत कलमठतर्फे करण्यात आले आहे.





