राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
अर्ज दाखल करण्याची मुदत – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025
अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची मुदत – 2 जानेवारी 2026
चिन्ह वाटप/उमेदवारी अंतिम यादी – 3 जानेवारी 2026
मतदानाची तारीख – 15 जानेवारी 2026
मतमोजणी – 16 जानेवारी 2026
या २९ महानगरपालिकांमध्ये एकूण २८६९ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. महानगरापालिका क्षेत्रातील ३ कोटी ४७ लाख मतदार नव्या कारभाऱ्यांचा कौल देणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली.
मुंबई महानगरपालिकेसाठी खर्चमर्यादेबाबतही आयोगाने स्पष्टता दिली असून, मुंबईतील एका प्रभागात उमेदवाराला केवळ १५ लाख रुपयांची खर्चमर्यादा लागू असेल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण १० हजार १११ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत खर्चाची मर्यादा किती?
- अ वर्ग – 15 लाख
- ब वर्ग – 13 लाख
- क वर्ग – 11 लाख
- ड वर्ग – 9 लाख
तसेच, या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणत्या महापालिका मध्ये निवडणूक
. मुंबई
. ठाणे
. नवी मुंबई
. मीरा भाईंदर
. वसई विरार
. कल्याण डोंबिवली
. उल्हासनगर
. भिवंडी
. पनवेल
. पिंपरी चिंचवड
. पुणे
. अहिल्यानगर
. कोल्हापूर
. सांगली मिरज कुपवाड
. इचलकरंजी
. सोलापूर
. नाशिक
. मालेगाव
. छत्रपती संभाजीनगर
. जालना
. जळगाव
. धुळे
. अकोला
. नागपूर
. अमरावती
. चंद्रपूर
. लातूर
. परभणी
. नांदेड वाघाळा






