मालवण (प्रतिनिधी) — भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्या संस्कार विभागाच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या प्रवचनमालेतील चौथे पुष्प शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता कुणकवळे गाव शाखेत आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष तसेच बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य’ या विषयावर धम्म प्रवचन होणार आहे.
या प्रवचनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महिला शाखेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक, सर्व गाव शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच उपासक-उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धम्म प्रवचनासाठी सर्वांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात आणि वेळेत उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी सांगितले आहे.







