मालवण (प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी रविकांत कदम, तर सरचिटणीसपदी नचिकेत पवार यांची निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू आणि शंकर कदम उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी प्रकाश पवार, कार्यालयीन सचिवपदी शंकर कदम, हिशोब तपासणीसपदी वैभव कदम यांची निवड झाली. संस्कार विभागाच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत कदम, प्रचार व पर्यटन विभागाच्या उपाध्यक्षपदी संग्राम कासले, तर संरक्षण विभागाच्या उपाध्यक्षपदी योगेश वराडकर यांची निवड करण्यात आली.
संस्कार विभागाच्या सचिवपदी सचिन कासले व मिलिंद पवार, प्रचार व पर्यटन विभागाच्या सचिवपदी संदीप कदम व संकेत पेंडूरकर, तर संरक्षण विभागाच्या सचिवपदी गणेश कासले व अमोल तळगावकर यांची निवड झाली. संघटक म्हणून राजेंद्र जाधव, विशाल डिकवलकर, भरत पेंडूरकर, गौरव जंगम आणि भिवा तळगावकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष, सरचिटणीस आणि संपूर्ण कार्यकारिणीने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कार्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, संजय पेंडूरकर, शिवप्रसाद चौकेकर, आर. डी. चेंदवणकर, विलास वळंजू आणि शंकर कदम यांनी नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नूतन तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार आणि कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने संघटनेच्या कार्याला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.






