मालवण | प्रतिनिधी
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘श्री महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक-मालक मित्रमंडळ’ यांच्या वतीने श्रावणातील प्रत्येक सोमवारी भव्य भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन कार्यक्रमांना सायंकाळी ६.३० वाजता सुरुवात होणार असून, सर्व भजनप्रेमींनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावणातील पहिल्या भजनाचे आयोजन १७ ऑगस्ट रोजी करण्यात आले असून, यावेळी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी-कुडाळ यांचे भजन होणार आहे. बुवा प्रसाद पंढरी आंबडोसकर, पखवाज प्रथमेश राणे आणि तबला साईप्रसाद नाईक साथसंगत करणार आहेत.
२४ ऑगस्ट रोजी प.पू. राऊळ महाराज भजन मंडळ, पिंगुळी-कुडाळ यांचे भजन होणार असून, बुवा मयूर पिंगुळकर, पखवाज अमन सातार्डेकर आणि तबला ओंकार राऊळ साथसंगत करतील.
३१ ऑगस्ट रोजी नादब्रह्म भजन मंडळ, कसाल यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. बुवा सुंदर मेस्त्री, पखवाज सिद्धेश मेस्त्री आणि तबला आयुष परब सहभागी होणार आहेत.
तसेच ७ सप्टेंबर रोजी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, तुळस यांचे भजन होणार असून, बुवा पुरुषोत्तम परब आणि पखवाज पांडुरंग परब साथसंगत करणार आहेत.
श्रावण महिन्यातील या भजनमालिकेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, विविध भजन मंडळांच्या सादरीकरणाचा आस्वाद भजनप्रेमींना घेता येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






