मालवण, प्रतिनिधी :
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथील ना. ग. गोरे सभागृहाच्या नूतनीकरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. वातानुकूलनासह विविध आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन श्री. पद्मनाभ तथा किशोर शिरोडकर, कार्याध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या शुभहस्ते होणार आहे.
हा सोहळा माजी महापौर स्व. राजाराम कृष्णाजी चिंबुलकर यांच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या ॲड. कांचन राजाराम चिंबुलकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.
नूतनीकरण सोहळ्यानंतर “आजच्या काळासाठी तुकोबा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ग्रंथ प्रकाशन, परिसंवाद आणि कवी संमेलन असे विविध उपक्रम होणार आहेत.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे होणाऱ्या या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण समस्त बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.






