महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी अवघ्या दहा दिवसांत ५३ सभा आणि रोड शो घेत राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व उर्जा निर्माण केली आहे. २२ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२५ या कालावधीत शिंदेंचा दौरा अक्षरशः झंझावात ठरला असून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पालघर— अशा सर्व प्रमुख विभागांमध्ये त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.
सभास्थळी उसळणारा उत्साह, भगव्याने नटलेले रस्ते आणि घोषणांचा गडगडाट यामुळे अनेक ठिकाणी जागा अपुरी पडली. काही ठिकाणी लोकांनी सभास्थळाबाहेरूनच भाषण ऐकत शिंदे यांना जोरदार पाठिंबा दर्शविला. या दौऱ्यामुळे राज्यात शिवसेनेची जोरदार लाट असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.
“जनतेचे प्रेम हेच माझे बळ” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रत्येक सभेत शिंदेंनी स्थानिक प्रश्न, विकासकामे, शेतकऱ्यांच्या अडचणी, तरुणांसाठी रोजगार, पायाभूत सुविधा आणि शासनाने राबवलेल्या उपक्रमांवर थेट जनसंवाद साधला.
“जनतेचा विश्वास, भगव्याचा झेंडा आणि विकासमार्ग — याच बळावर महाराष्ट्र पुढे जात आहे,” असे शिंदेंनी ठामपणे सांगितले.
जनतेचा प्रतिसाद मात्र अधिक ठळक—
“काम करणारा नेता हवा, आणि शिंदे ते करतात!”
अनेक मतदारांनी दिलेला हा अभिप्राय राजकीय चर्चेला नवीन वळण देणारा ठरत आहे.
राजकीय समीकरणात बदल? — शिंदे दौऱ्याची चर्चा राज्यभर
राजकीय विश्लेषकांचे मत—
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा अभूतपूर्व दौरा निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतो.
प्रत्येक दिवशी अनेक विभागात सलग पाच-पाच सभा घेत शिंदे यांची कामगिरी ‘मराठी राजकारणातील इतिहासनिर्मिती’ मानली जात आहे.
१० दिवसांचा झंझावाती दौरा — दिवसनिहाय आढावा
२२ नोव्हेंबर — पालघर विभाग
डहाणू, जव्हार, पालघर, वाडा — आदिवासी भागात थेट संपर्क, विकासाचे आश्वासन.
२३ नोव्हेंबर — सोलापूर व पुणे विभाग
अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, फुरसुंगी, रूकडी — मोठी गर्दी, उत्साहवर्धक प्रतिसाद.
२४ नोव्हेंबर — उत्तर महाराष्ट्र
धुळे, पिंपळनेर, नाशिक (सटाणा, मनमाड, सिन्नर), अहमदनगर, श्रीरामपूर.
२५ नोव्हेंबर — विदर्भ
गोंदिया, भंडारा, पवनी, नागपूर (उमरेड), चंद्रपूर (भद्रावती, वरोरा).
২৬ नोव्हेंबर — मराठवाडा / मध्य महाराष्ट्र
वणी, पांढरकवडा, वाशिम, मालेगाव-वाशिम, बुलढाणा, सिंदखेडराजा.
२७ नोव्हेंबर — नंदुरबार-जळगाव मार्ग
तळोदा, जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोरा, संगमनेर.
२८ नोव्हेंबर — पश्चिम महाराष्ट्र
इगतपुरी, येवला, मंचर, फलटण, कराड, विटा.
२९ नोव्हेंबर — विविध विभागांचा संयुक्त दौरा
शेवगाव, उदगीर, हिवरखेड, बदलापूर, अंबरनाथ, खुंटवली, शिवाजीनगर.
३० नोव्हेंबर — कोकण
रोहा, चिपळूण, लांजा, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी.
०१ डिसेंबर — अंतिम दिवस
पैठण, कन्नड, त्र्यंबकेश्वर, जुन्नर, चाकण.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभरातील ५३ सभांचा विक्रमी दौरा केवळ निवडणूक प्रचार नव्हे, तर जनतेशी एक व्यापक संवाद मोहीम ठरला आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये या जनआधाराचा परिणाम स्पष्ट दिसून येईल, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.







