मालवण दि प्रतिनिधी
‘भावेश ग्रुप ऑफ बिझनेस’ संचलित “महाराज फास्ट फूड अँड रेस्टॉ” या प्युअर व्हेज दालनाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत, कोल्हापूर शिक्षण संस्थेचे दौलत देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. मालवण बाजारपेठेतील सिंधुबझार समोर खास शाकाहारी खवय्यांसाठी हे दालन सुरु करण्यात आले आहे.
याठिकाणी चायनीज, पंजाबी, इंडियन, साऊथ इंडियन डिशेस, स्नॅक्स, सॅन्डविच, डोसा, उत्तप्पा, पावभाजी, सूप, तंदुरी, पुलाव, बिर्याणी, ज्यूस, मिल्क शेक्स, मॉकटेल यांसह सुमारे १७५ हून अधिक प्युअर व्हेज पदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या शुभारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, उद्योजक उदय देसाई, नगरसेवक मंदार केणी, परशुराम पाटकर, राजू बिडये, उपविभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, मातृत्व आधार फाउंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, संतोष नागवेकर यांच्यासह महाराज रेस्टोरंटचे सर्वेसर्वा उद्योजक सागर शिवाजीराव वाडकर, अमित राऊत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी देखील महाराज रेस्टोरंटला भेट देऊन सागर वाडकर व अमित साटम यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा देखील शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सिद्धेश मांजरेकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







