मालवण : (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील न्हिवे येथील श्री देवकी माता मंदिरात शुक्रवार दि. ८ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवारी सकाळी ८ वाजता श्री देवकीमातेची मंगलपूजा, ९ वाजता अभिषेक, १० वाजता होमहवन, ११.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० सायंकाळी ४.३० वाजता हळदीकुंकू समारंभ, ६ वाजता स्थानिक भजन, ७ वाजता श्री देवी पावणाई दिंडी भजन मंडळ, माळगाव हुमरोसवाड़ी यांचे दिंडी भजन, रात्री १० वाजता मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवकीमाता प्रासादिक भजन मंडळ न्हिवे यांनी केले आहे.







