मालवण (प्रतिनिधी)
आचरे गाऊडवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. ३ मे रोजी होणार आहे. सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, ७ वाजता दीप प्रज्वलन सोहळा, रात्री ८ वाजता मान्यवर व गुणवंतांचा सत्कार, ९.३० खुली ‘समूह नृत्य स्पर्धा” होईल. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०,०००, १५,००० व १०,००० रुपये व प्रत्येकी चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







