मालवण (प्रतिनिधी)
समस्त मेतर , मेथर , काळमेथर, लोणे, लोंढे, शेलटकर, हडीकर परिवाराच्या हडी गाबीतवाडा येथील मूळपुरुष स्थानाचा चौथा वर्धापन दिन दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री मूळपुरुषाचा अभिषेक, होमहवन, आरती, दुपारी महाप्रसादाचा आणि सायंकाळपासून भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी मेतर, मेथर, काळमेथर, लोणे, लोंढे, शेलटकर, हडीकर कुटुंबियांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







