मालवण : (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील देऊळवाडा येथील सातेरी मंदिरनजीक असलेल्या महापुरुष पार येथे बालगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने शनिवार, दि. २ मे रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सायंकाळी ५ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येणार असून, रात्री ७.३० वाजल्यापासून सुश्राव्य संगीत भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन बालगोपाळ मित्रमंडळ, देऊळवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.







