मालवण : दि. प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या क्षेत्रातील मेढा येथे हॉटेल आना नाना ते पांगे चाळ मार्गावरील गटार बांधकामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक शशिकांत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान जिल्हास्तर सन २०२५-२६ अंतर्गत या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी सुमारे ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून नुकताच या कामाचा शुभारंभ पार पडला.
मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा गावंकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, पप्या कांबळी, किशोर तळाशीलकर, संदीप मालांडकर, कमलेश कोचरेकर, अनिल कांदळकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.







