मालवण : (प्रतिनिधी)
काळेथर येथील महापुरुष मंदिर, पिरखोलीवाडी येथे रविवार, दि. ३ मे रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येणार असून, रात्री १० वाजता सागरेश्वर दशावतारी नाट्यमंडळ, आवेरा-वेंगुर्ला यांच्यावतीने ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







