मालवण : (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघ व दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. ३ मे रोजी करण्यात आले आहे. समाज बांधवांमध्ये एकात्मता व पारंपरिक संस्कार जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत गणेश प्रभुलकर यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विवेक रायकर, राजू पनवेलकर, राजू पाटणकर, महेश घारे, अण्णा धारगळकर, रत्नदीप मालवणकर, मोहन तळवणकर व संदीप तळवडेकर आदींचा सहभाग आहे. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.







