मालवण (प्रतिनिधी)
कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत सौ. रसिका राजेंद्र तेडोलकर (कसाल- कुडाळ) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन बॅ. नाथ पै वाचनालय मालवणच्या ग्रंथपाल ऋजुता केळकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषदेचे मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर हे होते. उद्धाटन सोहळ्याचे प्रास्ताविक गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मधुरा माणगावकर (कणकवली) आणि ऋतुजा केळकर यांनी केले.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हेमंत मोतीराम पाटकर (कणकवली), तृतीय क्रमांक सौ.उज्वला चंद्रशेखर धानजी (कणकवली) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ म्हणून श्रेया उमेश कुलकर्णी (ओरोस- कुडाळ) यांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणून योगेश रविंद्र मुणगेकर (आचरा), सुधाकर महादेव वळंजू (पणदूर), काशीराम बाळकृष्ण अपराज (चिंदर) यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळा सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी चंद्रशेखर धानजी, अरविंद कदम, रमाकांत शेटये, एकनाथ गायकवाड, परीक्षक मधुरा माणगावकर व ऋतुजा केळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एकनाथ गायकवाड यांनी केले. स्पर्धेसाठी ग्रंथपाल विवेक उर्फ बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल चैताली सुतार, लिपिक चैताली गोसावी, ग्रंथालयीन कर्मचारी समिधा जाधव यांनी परिश्रम घेतले.







