Free retinal (OCT) screening camp for diabetic patients to be held in Malvan on March 25 at Limaye Hospital. Limited slots available; registration required.
मालवण : प्रतिनिधी
मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांवर वेळीच निदान आणि उपचार व्हावेत, यासाठी मालवणमध्ये विशेष नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब मालवण आणि आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून लिमये हॉस्पिटल येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (OCT) तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन आणि सुदर्शन आय हॉस्पिटल, सांगली यांची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तपासणीद्वारे मधुमेहामुळे होणाऱ्या अंधत्वाचा धोका ओळखून वेळेत उपचाराची दिशा मिळू शकणार आहे.
विशेषतः ५० वर्षांवरील मधुमेहग्रस्तांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ६० रुग्णांचीच तपासणी केली जाणार आहे.
नावनोंदणीसाठी इच्छुकांनी लिमये हॉस्पिटल येथे ०२३६५-२५२२६६ किंवा ७०५७९०६६८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.







