मालवण, दि. प्रतिनिधी :
कट्टा येथील वराडकर हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रदर्शनात विविध गटातून प्रशालेच्या रुद्र महेश भाट, श्लोक समीर चांदरकर तसेच तेजस रघुनाथ मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला संस्थेचे स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी विद्यार्थी सुधाकर राणे व बाबी पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सचिव सुनील नाईक, पर्यवेक्षक व विज्ञान प्रमुख महेश भाट, विज्ञान शिक्षक भूषण गावडे, शिक्षिका सिमरन चांदरकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सचिव सुनील नाईक यांनी विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. मोबाईल, संगणक, औषधनिर्मिती तसेच शेतीतील आधुनिक बदल हे विज्ञानाचीच देण असून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण ७४ विज्ञान प्रतिकृती सादर करत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.
निकाल पुढीलप्रमाणे :
इयत्ता पाचवी गट :
प्रथम – रुद्र महेश भाट
द्वितीय – डिंपल गणेश परब
तृतीय – सोहम शंकर मेस्त्री
उत्तेजनार्थ – कार्तिक देवदास ढोलम
इयत्ता सहावी–सातवी गट :
प्रथम – श्लोक समीर चांदरकर
द्वितीय – गौरांग विष्णू मेस्त्री
तृतीय – महावीर हरी कांबळे, स्वस्तिक भिवा मांजरेकर
उत्तेजनार्थ – साईश शांताराम थवी, गार्गी सुरेश कांबळी, आर्या संजय वायंगणकर
इयत्ता आठवी–नववी गट :
प्रथम – तेजस रघुनाथ मेस्त्री, निखिलेश रवींद्र मेस्त्री
द्वितीय – संचित राजन गावडे, अभिजीत खोत, संदेश संतोष भोसले
तृतीय – यामिनी नित्यानंद म्हाडगुत, सिध्दी जितेंद्र महाभोज
उत्तेजनार्थ – चंदना बाळकृष्ण शेटये, श्रुती सुनील फोपळे, धनश्री वैभव आचरेकर, मयुरी श्यामसुंदर चिरमुले, ओंकार सागर रोहीलकर, प्रांजय गणेश वायकर
स्पर्धेचे परीक्षण वीणा शिरोडकर, प्रकाश कानुरकर व अमिषा परब यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर चांदरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान प्रमुख महेश भाट यांनी केले. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







