वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६ भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या यात्रेच्या संयोजकपदी गिरीष गंगाधर फाटक यांची निवड करण्यात आली आहे.
हिंदू धर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रा २०२६ संदर्भातील पहिली नियोजन बैठक शनिवारी सायंकाळी विठ्ठल मंदिर येथे पार पडली. याबाबतची माहिती बाबुराव खवणेकर यांनी दिली.
बैठकीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नित्यानंद आठलेकर, आशिष पाडगावकर, राजन केरकर, वसंत तांडेल, विद्याधर कडुलकर, तुळशीदास ठाकूर, अजय गडेकर, साईप्रसाद नाईक, रिया केरकर, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, गौरी मराठे, सुजाता पडवळ, वृंदा मोर्डेकर, वैभव होडावडेकर, अभि वेंगुर्लेकर, युवराज ठाकूर, दिनेश आचार्य, गुरुप्रसाद प्रभूखानोलकर, अमित नाईक, अमोल आरोसकर, संजय तेरेखोलकर आदी हिंदू धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई यांनी सांगितले की, गतवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागत यात्रा अधिक भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध समाज, संस्था, महिला मंडळे, युवक मंडळे तसेच विविध सांप्रदायिक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वतंत्र बैठका घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार आहे.
संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.







