वेंगुर्ले प्रतिनिधी
उत्तराखंड ते महाराष्ट्रातील तब्बल ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे कु. रणवीर (कार्तिक) सिंग यांचे वेंगुर्ले येथे हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले येथील माणिकचौक परिसरातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव खवणेकर सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन रणवीर सिंग यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करत गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांच्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी हिंदुधर्माभिमानी मंडळी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







