मालवण | नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचा जोरदार प्रचार दौरा पार पडला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत, नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. पंकज सादिये आणि सौ. सुवर्णा वालावलकर यांच्या सोबत भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे विशेष उपस्थित होते.
प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्साह उल्लेखनीय होता. प्रत्येक घरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास आणि अपेक्षांची भावना यामुळे उमेदवारांचे मनोबल अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसले.
प्रभागातील विविध भागात भेट देत नागरिकांच्या समस्या, स्थानिक अपेक्षा आणि आवश्यक विकासाच्या मार्गांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मोहिमेत श्री. अशोक सावंत तसेच भाजपचे इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. टीमवर्क, समन्वय आणि जनतेप्रतीची निष्ठा या सर्व घटकांमुळे प्रचार मोहीम अधिक उर्जित होऊन प्रभावी ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधील वातावरण भाजपच्या बाजूने झुकत असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.







