भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांनी घेतला खासदार नारायण राणे यांचा विजयाचा मंत्र
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या समीर अनंत नलावडे यांनी आज आपल्या सर्व १७ नगरसेवक उमेदवारांसह भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. भाजपची ही ताकदवान टीम निवडणूक रणांगणात सज्ज असल्याचे या भेटीने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
या भेटीवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, राज्याचे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेत बोलताना खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—
“माझा पाठिंबा फक्त आणि फक्त भाजपच्या उमेदवारांना आहे; इतर कोणालाही नाही.”
तसेच त्यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून विजय मिळवण्यासाठी खास टिप्स दिल्या. राणे यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व हा भाजप पॅनेलसाठी मोठा बूस्टर ठरल्याचे वातावरण होते.
या भेटीत उपस्थित नगरसेवक पदाचे उमेदवार :
राकेश बळीराम राणे, प्रतीक्षा प्रशांत सावंत, स्वप्निल शशिकांत राणे, माधवी महेंद्र मुरकर, मेघा अजय गांगण, स्नेहा महेंद्र अंधारी, सुप्रिया समीर नलावडे, गौतम शरद खुडकर, मेघा महेश सावंत, आर्या औदुंबर राणे, मयुरी महेंद्र चव्हाण, मनस्वी मिथुन ठाणेकर, गणेश उर्फ बंडू हर्णे, सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, विश्वजीत विजयराव रासम, संजय मधुकर कामतेकर, आबिद नाईक आदी सर्व उमेदवार उपस्थित होते.
भाजपच्या शक्तीप्रदर्शनाच्या या महत्वाच्या क्षणानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा उमेदवार सरस ठरण्याची चिन्हे अधिक स्पष्ट होत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.







