On the occasion of Shiv Jayanti, Vasundhara Janakalyan Foundation organized a tree distribution drive at Malvan ST Stand, distributing 40 saplings and spreading awareness about environmental conservation.
मालवण : (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनतर्फे मालवण एस.टी. स्टँड येथे वृक्ष वाटप अभियान उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ४० नागरिकांना मोफत झाडांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवाहन केले.
उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा उल्लेख करत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे, असे सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे, लिपीक दिलीप हिंदळेकर, जनार्दन मांजरेकर, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, सदस्य स्वप्नील मिटकर, राज्य परिवहन मंडळाचे चालक-वाहक व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला बचतगट सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्ष वाटपाच्या या उपक्रमामुळे शिवजयंती निमित्त सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीव जागृत करण्याचा संदेश देण्यात आला.








