A free eye check-up and cataract surgery camp will be organized on February 20 at Chinder by Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray faction) on the occasion of Shiv Jayanti, offering computerized eye testing and affordable spectacles.
मालवण (प्रतिनिधी):
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा चिंदर यांच्या वतीने शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चिंदर गावठणवाडी, सातेरी मंदिर नजीक, मिलिंद चिंदरकर यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
या शिबिरात नामवंत तज्ञ डॉक्टरांकडून कॉम्प्युटराइज्ड नेत्र तपासणी करण्यात येणार असून गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील शिबिरात असणार आहे.
आरोग्य सेवेसाठी आयोजित या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नागरिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.








