Maha Shivratri festival was celebrated with devotion and enthusiasm at Akari Brahmandev Temple in Dangmode Sada, Malvan, with large participation of devotees and Mahaprasad
मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील डांगमोडे सडा येथील आकारी ब्राह्मणदेव स्थानावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील तसेच बाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
डांगमोडे सडा येथील आकारी ब्राह्मणदेव हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून येथे महाशिवरात्रीसह विविध धार्मिक उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्साहात साजरे केले जात आहेत. यंदाही महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजन करण्यात आले.
दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि सुव्यवस्थित नियोजनामुळे महाशिवरात्री उत्सव यशस्वीपणे पार पडल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले







