Maha Shivratri will be celebrated on February 15 at Shri Rameshwar Temple in Kandalgav, Malvan, with rituals, bhajans, Puran reading and a grand palkhi procession from Rameshwar Temple to Sateri Devi Temple.
कांदळगाव येथील ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, कांदळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सकाळी विधीवत श्री रामेश्वर देवाची पूजाअर्चा व अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांना ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ९.३० वाजता पुराण वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सांगता श्री देव रामेश्वर यांच्या मंदिर पालखी प्रदक्षिणा सोहळ्याने होणार आहे. श्री रामेश्वर मंदिर ते सातेरी देवी मंदिर असा हा भव्य पालखी सोहळा पार पडणार असून या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे देवस्थान ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.







