Akkalkot Vatvruksha Devasthan president Mahesh Ingle visited Achara Rameshwar Temple in Sindhudurg, offered prayers and interacted with devotees and temple committee members.
मालवण | प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना आचरा येथील रामेश्वर मंदिर, आचरा येथे सदिच्छा भेट देऊन रामेश्वर देवाचे दर्शन घेतले.
अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्य दैनंदिन पूजा-अर्चा तसेच मठातील वार्षिक सण-उत्सवांची माहिती सर्वसामान्य भक्तांपर्यंत पोहोचावी, स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी स्नेहबंध वाढावा या उदात्त हेतूने महेश इंगळे सिंधुदुर्गात आले होते. या भेटीदरम्यान रामेश्वर देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी व खजिनदार कपिल गुरव यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच काकड आरती मंडळाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी काकड आरती मंडळाचे मंदार सांबारी, अर्जुन बापर्डेकर, रविकांत भिसळे, दौलत राणे, श्रीमती वैशाली सांबारी, सुधीर मुणगेकर, प्रकाश पुजारे, बाळू कोदे, पंकज घारे, दिपक मेस्त्री, वैशाली मेस्त्री, श्रीमती मेस्त्री, शोभा पेडणेकर यांच्यासह देवस्थान समितीचे मंगेश मेस्त्री, हडपीड देवस्थानचे नंदकुमार पेडणेकर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी वटवृक्ष देवस्थानच्या वतीनेही स्वामी भक्तांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या भेटीमुळे आचरा परिसरातील भाविकांमध्ये भक्तीभाव व देवस्थानांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








