Construction committee chairman Sahadev Bapardekar inspected drainage works near Medha Mauninath Temple road in Malvan and directed officials to ensure quality development works.
मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर मार्गावरील गटार बांधकामाची पाहणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी केली. शहरात सध्या सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीनेच पूर्ण झाली पाहिजेत, तसेच कामावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवून नियमानुसार कामे करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका मेघा सावंत तसेच बांधकाम विभाग अभियंता राजा केरीपाळे उपस्थित होते.
शहरात सुरू असलेली कामे नियमानुसार व दर्जेदार पद्धतीने करून घेणे ही बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कामावर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित लक्ष ठेवून दर्जा तपासणी करावी, नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून कामे वेळेत पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व सूचनाही जाणून घेण्यात आल्या. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.







