After Anganewadi Bharadi Mata fair, Malvan Taluka Gram Panchayat Employees Union conducted its first cleanliness drive at the temple premises with officials’ guidance.
मालवण | प्रतिनिधी
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या जत्रेनंतर मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी प्रथमच आंगणेवाडी येथे स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे मंदिर परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छ व स्वच्छतेचा संदेश देणारा बनला.
या स्वच्छता मोहिमेचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर तसेच गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सकाळपासून मंदिर परिसरात साफसफाईस सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ परब, मालवण तालुका अध्यक्ष आशिष आचरेकर, उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळा परब, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश गावठे यांच्यासह महिला कर्मचारी करुणा राणे, मयुरी पवार, शर्मिला घाडीगावकर तसेच विजय चव्हाण, नरेश परब, रणजीत दत्तदास, विश्राम माळगावकर, गजानन सुर्वे, दीपक मांजरेकर, स्वप्नील सुद्रिक, उत्तम धुरी, किशोर किर्लोस्कर, गणेश सांडव, उत्तम भोगले, तेजस परब, सोनू शिंदे, प्रकाश गावडे, जगदीश केळुस्कर, अक्षय पाताडे, महेश हडकर, उमेश सावंत, स्वप्नील घाडीगावकर व तालुक्यातील अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत्रेनंतर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा हटवून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.







