मालवण – प्रतिनिधी
पोईप दि (वार्ताहर )
पोईप सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमती सुमेधा संतोष पाताडे तसेच श्रीमती प्रज्ञा भाऊ चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ पोईप येथील ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर येथे शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उमेदवार सुमेधा पाताडे, पंचायत समिती उमेदवार प्रज्ञा चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, मालवण तालुका संपर्कप्रमुख पंकज वर्दम, समाजसेवक गोपीनाथ पालव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्ताराम पालव, पोईप भाजप कार्यकर्त्यांनी अध्यक्ष शंकर ( बाळा )पालव, भाऊ चव्हाण, परशुराम नाईक, श्यामसुंदर पोईपकर, माजी उपसरपंच संदीप सावंत, शिवरामपंथ पालव, राजेंद्र गावडे, लक्ष्मण जाधव, सोमा जाधव, गोविंद ( बाळा ) पोईपकर, अजय जाधव, रुपेश वर्दम, सुरेश वडर, जयवंत पोईपकर, महेश चव्हाण, दर्शन चव्हाण, स्वप्नील पोईपकर, सखाराम हिंदळेकर, बाळा नाईक, सुशील जाधव, आशू जाधव, सुशील पालव व पोईप येथील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवार सुमेधा पाताडे यांनी आपण मागील कित्येक वर्षे राजकारणात असून जिल्हा परिषद मध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. शासनाच्या आरक्षणाप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा परिषदेत जाण्याची संधी यानिमित्ताने मिळालेली असून आपण जिल्हा परिषदेत गेल्यावर पोईप येथील विकास कामांचा प्राधान्याने विचार करू, तरी आपण सर्वांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी शिवसेना व भाजपा महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.








