पोईप प्रतिनिधी-
जिल्हा परिषद मतदारसंघ मसुरे मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जि.प.उमेदवार सौ.आनंदी परब आणि पं.स.उमेदवार वैभव चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मालोंड बेलाची वाडी येथील श्री देव नारायण मंदिर येथे देवाला श्रीफळ ठेऊन व साकडे घालुन करण्यात आला,
या वेळी उमेदवारांसह आबा परब, सुहास पेडणेकर संतोष परब सुनील घाडीगांवकर राहुल सावंत पप्पु परब आयवान फर्नांडिस शरद गावडे विनोद गावडे प्रवीण फणसे गोविंद परब मोहन घाडीगांवकर शाखा प्रमुख चंद्रकांत मिठबावकर, उपविभाग प्रमुख विजय घाडीगांवकर पांडुरंग तांडेल विजय घाडीगांवकर संतोष घाडीगांवकर, अभिजीत सारंग, मोहन घाडीगांवकर, कांता घाडीगांवकर, रुपेश घाडीगांवकर उत्तम घाडीगांवकर, शामकांत घाडीगांवकर,भारती घाडीगांवकर, यांच्या सह अनेक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री देव नारायण मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर मालोंड, बेलाची वाडी या दोन्ही गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपणांस मतदान करून निवडून आणण्याचे आवाहन केले गेले .







