सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी:
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळण्यात आली. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन मिनिटांच्या स्तब्धतेद्वारे उपस्थितांनी हुतात्म्यांच्या बलिदानास आदरांजली अर्पण केली.







