मुंबई (प्रतिनिधी) :
मौल्यवान धातूंच्या बाजारात आज पुन्हा तेजी दिसून आली. चांदीचा दर प्रति किलो ₹३,३०,००० इतका नोंदविण्यात आला असून, यामुळे चांदीने उच्चांक गाठल्याचे चित्र आहे. तर मुंबईत २४ कॅरेट (९९.९%) शुद्धतेच्या सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹१,५९,७०५ इतका राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या हालचाली, तसेच सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे. लग्नसराई व गुंतवणूकदारांची वाढती मागणी याचाही दरांवर परिणाम होत आहे.
दरम्यान, येत्या काळात बाजारातील परिस्थितीनुसार सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.






