कुडाळ | प्रतिनिधी —
कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत या उमेदवारांना एबी फॉर्मचे अधिकृत वाटप करण्यात आले.
यामध्ये आंब्रड जिल्हा परिषदेसाठी सौ. दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डे जि.प.साठी नागेश आईर, पावशी जि.प.साठी दादा साईल, घावनळे जि.प.साठी दीपक नारकर, नेरूर देऊळवाडा जि.प.साठी संजय पडते, तर माणगाव जि.प.साठी रूपेश कानडे यांची नावे निश्चित झाल्याचे समजते.
पंचायत समिती गटांसाठी माणगाव येथून कौशल जोशी, गोठोस येथून दिव्यानी खरात, वेताळबांबर्डे येथून अश्विनी सावंत, डिगस येथून निखील कांदळगावकर, जांभवडे येथून बाळू मडव, कसाल येथून बापू पाताडे, नेरूर येथून निता नाईक, पाट येथून प्रियांका जळवी तसेच साळगाव येथून मिलिंद नाईक यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.






