मालवण (प्रतिनिधी)
वायंगणी येथील श्री गणेश मंदिर या मंदिरामध्ये माघी गणेश जयंती उत्सव व २६ वा वर्धापन दिन सोहळा दि. २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अभिषेक सोहळा, १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची महापूजा, १२ ते १ वाजेपर्यंत महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, ३ ते ४ वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ, दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुश्राव्य भजने, सायंकाळी ७ वाजता आरतीः रात्री ९.३० वाजता महिलांचा २०x२० डबलबारी भजनाचा सामना श्री देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे, कुडाळ (बुवा – योगिता नंदू पवार, पखवाज श्रेया अनिल धुरी, झांज – काव्या नंदू पवार) विरुद्ध श्री भैराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ मोंड गावठाणवाडी (बुवा- स्वराली नाटेकर, पखवाज – मंजिल काळसेकर, झांज – कार्तिश गोसावी) यांच्यात होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







