मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गवळीवाडी येथील श्री मरीआई देवी मंदिरात मरीआई देवीचा वार्षिक उत्सव मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या दिवशी सकाळी ६ वाजता श्री मरीआई देवीच्या मूर्तीचे विधीवत पूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५ वाजता श्री मरीआई देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
या वार्षिक उत्सवात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावर्षीही सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विरशैव लिंगायत गवळी समाज, गवळीवाडी–कुंभारमाठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







