मालवण (प्रतिनिधी) :
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी ‘मैत्री चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. १८ जानेवारी रोजी मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर पार पडणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होणार असून, शैक्षणिक क्षेत्रातील स्नेहभाव आणि क्रीडावृत्ती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकास रुपये ११,०२६ व चषक, द्वितीय क्रमांकास रुपये ७,०२६ व चषक, तर तृतीय क्रमांकास रुपये ३,०२६ व चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासह अन्य वैयक्तिक बक्षिसेही प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रतीक लोके (मो. ८०८०७५३३३२), ध्वजेंद्र मिराशी (मो. ७६२०२६५९८१) व रवींद्र गावडे (मो. ९४२०४७३१९९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








