मालवण | प्रतिनिधी :
राज्यात पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांत भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात उत्साहाचे वातावरण असून, मालवण भाजपा कार्यालयात या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“भारतीय जनता पार्टीचा विजय असो…”, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो…”, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो…”, “भाजपा ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा विजय असो…”, “प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो…”, “पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आनंदोत्सवात भाजपा गटनेत्या नगरसेविका अन्वेशा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर, रविकिरण तोरसकर, नगरसेविका दर्शना कासवकर, तसेच सौरभ ताम्हणकर, पंकज सादये, गौरव लुडबे, सेजल परब, अमृता फाटक, महिमा मयेकर, भाई कासवकर, आबा हडकर, संमेश परब, अवी सामंत, महेश मयेकर, कुणाल खानोलकर, मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी सांगितले की, “राज्यातील जनतेने विकासावर विश्वास ठेवून भाजपा महायुतीला भरभरून पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकांमध्येही भाजपा महायुतीची ही विजयी घोडदौड अशीच कायम राहील.”







