मालवण | प्रतिनिधी कलाप्रेमी थोर विचारवंत बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने तरुणाईसाठी विशेष ‘सिने कथा कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला)’ या सिने करिअर सेमिनारचे १८ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. गडग्यावरच्या मुलांना पडद्यावर नेणारी सिनेमा करिअर सेमिनार ही संकल्पना असून त्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत असून चित्रपट क्षेत्रातील संधी, आव्हाने व करिअर मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

या सेमिनारमध्ये ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाचे लेखक, निर्माता व तंत्रज्ञ सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक विभाग, निर्मिती प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती देण्यात येणार आहे. हा सेमिनार १८ ते ३० वयोगटातील (स्त्री-पुरुष) युवक-युवतींसाठी खुला असून नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सेमिनार रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत दादा शिरोटे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे होणार आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी – श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर – ९४२२९४६२१२, श्री. संजय आचरेकर – ९४२१५६९७०४, श्री. वैभव – ८२९१३९५२५६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर व कोषाध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सिनेक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





