कुडाळ – प्रतिनिधी | शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी बैठक व्यवस्थेचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना कुडाळ शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून शहरातील विविध ठिकाणी एकूण दहा बेंच उपलब्ध करून दिले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत कविलकाटे येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात २, मळेवाडी येथे २, कुमळाचा गाळू येथे १, मुंबई–गोवा महामार्गालगत असलेल्या श्रीरामवाडी नरसिंह मंदिर परिसरात २, लक्ष्मीवाडी मंदिर परिसरात १ तसेच तहसीलदार कार्यालयाजवळील विठ्ठलवाडी बालोद्यान (गार्डन) येथे २ बेंच बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या बेंचमुळे ज्येष्ठ नागरिक, प्रवासी व परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दि. ७ जानेवारी रोजी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात येत असून, याच अनुषंगाने सकाळी कविलकाटे येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बेंचचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, स्वखर्चातून भगव्या रंगाचे बेंच उपलब्ध करून देत जनतेच्या दैनंदिन गरजांकडे लक्ष दिल्याबद्दल नगरसेवक अभिषेक गावडे यांचे कौतुक होत आहे.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड. राजीव कुडाळकर, नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, कु. चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, उपशहर प्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, तालुका सचिव राकेश कांदे, चंदन कांबळी, राजवीर पाटील, संदेश चव्हाण, राजाराम गडेकर, निलेश जळवी, बाबू हरमलकर, आनंद अनावकर, राजन जळवी, प्रकाश जळवी, विलास वराडकर, महेश आळवे, बाबल आळवे, गोविंद मातोंडकर, रविंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.





