मुंबई, दि. — शिवसेना युवानेत्या अपूर्वा किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेट प्रशासनात तरुण नेतृत्वाला महत्त्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सामंत यांच्या निवडीबद्दल क्रीडाप्रेमी, शिवसैनिक व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्रात विकासात्मक निर्णय, पायाभूत सुविधांचा विस्तार, खेळाडूंना अधिक संधी आणि सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या कल्पना, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि युवकांना प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर राहील, अशी अपेक्षा आहे. अपूर्वा सामंत यांच्या या बिनविरोध निवडीमुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नवे ऊर्जा-संचार होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.





