मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धेत मास्टर ब्लास्टर संघाने शानदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले आणि मैत्री क्रीडा चषकावर आपले नाव कोरले.
“एक दिवस स्वतःसाठी व स्वतःच्या आरोग्य आणि आनंदासाठी” या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. सामने लिग पद्धतीने चार गटांमध्ये खेळवण्यात आले.
या स्पर्धेसाठी इलेव्हन फायटर्स (संघनायक – महेश भाट), मार्गदर्शक मास्टर्स (संघनायक – महेंद्र वारंग), मास्टर ब्लास्टर (संघनायक – शैलेश मुळीक) आणि मास्टर माईंड ११ (संघनायक – तुषार सकपाळ) असे चार संघ तयार करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन वायंगणी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी असरोडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील, काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अविनाश परब, आडवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. तुषार सकपाळ, तसेच स्पर्धेच्या संकल्पनेतून आयोजन करणारे महेंद्र वारंग, शैलेश मुळीक, महेश भाट, तुषार सकपाळ, सुमित मसुरकर, प्रसाद परुळेकर, शाम वारंग यांच्यासह मालवण तालुक्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद गावकर यांनी केले, तर सामन्यांचे समालोचन श्री. अजय शिंदे सर यांनी केले.
स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक – मास्टर ब्लास्टर, द्वितीय क्रमांक – मार्गदर्शक मास्टर्स, तृतीय क्रमांक – मास्टर माईंड ११ आणि चतुर्थ क्रमांक – इलेव्हन फायटर्स या संघांनी पटकावले. या यशाबद्दल सर्व विजेत्या व सहभागी संघांचे अभिनंदन करण्यात आले.





