मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य वधू-वर मिळून त्यांचे विवाह जुळण्यास चालना मिळावी, तसेच विवाहेच्छुक कुटुंबांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने रविवार, २० सप्टेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या सभागृहात विनामूल्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त गावाकडे आलेल्या समाजबांधवांचा तसेच गावातील विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एकत्रित परिचय व्हावा, गाव आणि शहर यांच्यात समन्वय साधत सुयोग्य स्थळे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचा असून गाबीत समाजातील विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागी युवक-युवतींनी नोंदणीसाठी जन्मटिपण, छायाचित्र आणि संपूर्ण वैयक्तिक माहिती सादर करणे आवश्यक आहे. ही माहिती व्हॉट्सॲपद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीत आयोजकांकडे देता येणार आहे.
समाजातील विवाहेच्छुक कुटुंबांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि योग्य स्थळांचा परिचय होण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे गाबीत समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी पालकांसह सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सुरेश बापर्डेकर – ९८६९१३२८८२, बाळू वस्त – ९३७१२१७६०६, राजरूप केळुसकर – ९४०४७५०२०४, रघुनाथ जुवाटकर – ९४२११४७४३७ आणि शशांक कुमठेकर – ९७६५७६६५५७ यांच







