मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा वार्षिक श्रावण जत्रोत्सव सोमवार, १ सप्टेंबर रोजी (तिसरा श्रावणी मंगळवार) मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.
जत्रोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, देवीची पारंपरिक पूजा व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील तसेच जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्त मंडळाने दिली.
तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहून श्री काळबादेवीचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







