मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर करण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात ही घोषणा केली. तालिका सभापती म्हणून सदस्य प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजीत वंजारी, सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी विधान परिषदेच्या कामकाजाचे संचालन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तालिका सभापतींच्या यादीत सदस्य प्रमोद जठार यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान सभापती अनुपस्थित असताना तालिका सभापती सभागृहाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.
प्रमोद जठार यांची तालिका सभापती म्हणून झालेली निवड ही त्यांच्या संसदीय अनुभवाची आणि सभागृहातील सक्रिय सहभागाची दखल असल्याचे मानले जात आहे. पावसाळी अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून, त्यासाठी सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यात तालिका सभापतींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.





