मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणुकीत एकता पॅनलने प्रगती पॅनेलचा दारुण पराभव करीत या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणुकीची
मतमोजणी काल सोमवारी चेंबरच्या फोर्ट मुंबई येथील कार्यालयात पार पडली .संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामधे नाशिक व सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यात ही निवडणूक झाली.
सिंधुदुर्गातील संपूर्ण उद्योग जगताचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष होते.बिनविरोध निवडणून आलेले चेंबरचे अध्यक्ष श्री रविंद्र माणगावे तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष व कोकणचे सुपूञ डाॅ.श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकता पॅनेलच्या माध्यमातून एकुण नऊ जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली होती. एकता पॅनेलने प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती त्याचे प्रतिबिंब आज निकालात दिसून आले.
एकता पॅनेलला सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाने व कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिलेला होता.
एकता पॅनेलचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवाराने विजय मिळवलेला असून एकता पॅनेलच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले संतोष राणे यानां १८६ मते मिळाली. तर मुंबई व कोकण विभागातून वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी उभे असलेले श्री सुधाकर शेट्टी यानी ८५४ मते घेऊन आपला विजय अधोरेखित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल साठी जे सात उमेदवार होते त्यात श्री राजन नाईक १७३, अँड.नकुल पार्सॅकर १६४, मनोज वालावलकर १५८, विजय केनवडेकर १४६, मिलींद प्रभू १४२, विशाल कामत १४१, कुणाल वरसकर १३९ मते घेऊन विजयी झाले
सर्व विजयी उमेदवारांचे चेंबरचे अध्यक्ष श्री रविंद्र माणगावे, चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष श्री आशिश पेडणेकर, माजी उपाध्यक्ष श्री श्रीकृष्ण परब,कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री संजय सावंत,सचिव श्री राजू जठार,सामाजिक कार्यकर्ते श्री रणजित देसाई तसेच जिल्ह्यातील विविध क्षेञातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छां दिल्या.







