मालवण
मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या या स्टंटबाजीत गाडीची ठोकर बसण्यापासून एक स्थानिक युवती बालबाल बचावली असतानाच त्या जाब विचारण्यासाठी त्या युवतीने थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने गाडी पद्मगडच्या दिशेने भरधाव पळवत गाडी पद्मगड किनारी लावून थेट समुद्रात उडी घेतल्याचा थरारक व धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. या प्रकाराने चक्रावलेल्या स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले तसेच समुद्रात पोहत जाणाऱ्या त्या तरुणाला स्थानिकांच्या सूचनेनुसार समुद्रातून जात असलेल्या किल्ला होडी व्यवसायिकानी आपल्या होडीत घेत बंदर जेटी येथे आणले. यावेळी पोलीसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले तसेच त्याची थार गाडी देखील ताब्यात घेतली आहे.







