मालवण (प्रतिनिधी)
मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ व २७ एप्रिल रोजी सग्रह श्री स्वामी समर्थ सिद्धयाग आणि नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.
दि. २६ रोजी सकाळी ८ पासून विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, प्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री स्वामी समर्थ पालखीनगर प्रदक्षिणा, ७ वा. भजन (बांदिवडे), रात्री ९ वा. भजनी बुवा शशिकांत सावंत (तरंदळे, खोतवाडी). दि. २७ रोजी सकाळी ८ वा. विविध धार्मिक कार्यक्रमांसह अभिषेक, आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४. वा. श्री सत्यनारायण महापूजा, ७वा. ‘अभंगवाणी” कार्यक्रम (गायक-तन्मय मेस्त्री, चैतन्य भोगले, सोहम चिंदरकर, पखवाज-विघ्नेश मेस्त्री, तबला-शुभम मेस्त्री), रात्री ९ वा. विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मर्डेवाडी यांचे भजन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष बाबूराव प्रभूगावकर यांनी केले आहे.






