मालवण : (प्रतिनिधी)
कोळंब येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून उपकेंद्र कोळंब यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व एक्स-रे शिबिराचे. आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे होणार आहे.
या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, एक्स-रे सेवा तसेच डॉक्टरांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रक्तदाब व रक्तातील साखर (शुगर) तपासणीची सुविधाही नागरिकांना मिळणार आहे. शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले आधारकार्ड व मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी-९४०३६४०४३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, गावातील प्रत्येक नागरिकाने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







