मालवण : (प्रतिनिधी)
कुंभारमाठ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, चौके यांच्या संयुक्त विद्यमाने कातकरी समाजातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये नागरिकांची रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे, ईसीजी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभारमाठच्या सरपंच पुनम वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, सदस्य प्रमोद भोगावकर, आरोग्यसेविका सौ. डॉरी, आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड, आशा सेविका प्रणिता भोगावकर, अश्विनी नेवाळे, सी. आर.पी. सारीका फोंडेकर, महिला बचत गट प्रतिनिधी दिपिका आंगणे, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉक्टर, प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरासाठी महेश फोंडेकर व सौ. सविता फोंडेकर यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे कातकरी समाजातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची मोठी संधी मिळाली असून ग्रामस्थांनी या शिबिराचे स्वागत केले.








